मैदानात अखिलाडू वृत्ती दाखवाल तर लढतीतून हकालपट्टी – आयसीसी

15

सामना ऑनलाईन । लंडन

मैदानात पंचांशी वाद घालणे, प्रतिस्पर्धी गोलंदाज अथवा फलंदाजांच्या अंगावर धावून जाणे आणि निर्णयावरून पंचांशी हुज्जत घालणे असे अखिलाडूवृत्तीचे प्रकार करणाऱ्या क्रिकेटपटूला थेट त्या लढतीतूनच बाहेर काढण्याचा अधिकार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पंचांना दिले आहेत. त्यामुळे यंदाच्या आयसीसी विश्वचषकात मैदानात गोंधळ घालणाऱ्या क्रिकेटपटूंची खैर नाही. आयसीसीने केलेल्या नव्या सात बदलानुसार आता एखाद्या फलंदाजाने मारलेला हवाई फटका क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटला लागून क्षेत्ररक्षकाने झेलला तर फलंदाजाला बाद ठरवले जाईल. पूर्वी असा चेंडू डेड मानून फलंदाजाला नाबाद ठरवले जायचे. शिवाय गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूचे दोन टप्पे पडले तर तो नो बॉल मानला जाईल असाही बदल या विश्वचषकापासून अमलात आणला जाणार आहे. याशिवाय फलंदाजाने यष्टय़ांकडे जाणारा चेंडू चपळाईने हाताने अडवल्यास त्याला बाद ठरवले जाणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या