Sri Lanka Blast पोलिसांनी 10 दिवसांपूर्वीच दिली होती सूचना

1

सामना ऑनलाईन । कोलंबो

श्रीलंकेत रविवारी आठ साखळी बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात 207 जणांचा मृत्यू झाले असून 450 लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये विदेशी नागरिकांचाही समावेश होता. 11 एप्रिल रोजी पोलीस प्रमुख जयसुंदरा यांनी एक विदेशी संघटना हल्ला करणार असल्याची सूचना दिली होती.

श्रीलंआ पोलीस प्रमुख जयसुंदरा यांनी 11 एप्रिल रोजी कोलंबो आणि हिंदुस्थान उच्चायोगावर नॅशन थोहीत जमात ही संघटना हल्ला करेल अशी सूचना जारी केली होती. नॅशन थोहीत जमात अर्थात एनटीजे ही संघटना मुस्लिम कट्टरतावादासाठी ओळल्खले जाते. गेल्या वर्षी या संघटनेने बुद्धाच्या मुर्ती फोडल्या होत्या. त्यानंतर ही संघटना प्रकाशझोतात आली होती.