सचिन तेंडुलकरवर गंभीर आरोप, अभिनेत्रीच्या फेसबूक पोस्टने खळबळ

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कास्टिंग काऊचविरोधात भररस्त्यात कपडे उतरवून खळबळ उडवणारी तेलुगू अभिनेत्री श्री रेड्डी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. श्री रेड्डी हिने क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरवर एक वादग्रस्त पोस्ट शेअऱ करून खळबळ उडवून दिली आहे.

श्री रेड्डी हिने गेल्या काही दिवसांपासून कास्टिंग काऊचमध्ये अनेक नावाजलेल्या लोकांचा सहभाग असल्याचे म्हटले होते. तिने काहींची नावे जाहीर देखील केली होती. आता तिने क्रिकेटचा देव सचिनवर आरोप लगावल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. श्री रेड्डीने आपल्या अधिकृत फेसबूक अकाऊंटवरून सचिनवर वादग्रस्त पोस्ट लिहिली आहे.

फेसबुक पोस्टमध्ये तिने नमूद केले आहे की, ‘एक रॉमँटिक व्यक्ती ज्याला आपण सचिन तेंडुलकर नावाने ओळखतो. तो हैदराबादला आला होता तेव्हा एका चार्मिंग मुलीसोबत त्याने रोमान्स केला होता. हाय प्रोफाईल चामुंडेश्वर स्वामी यांनी यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. एक महान खेळाडू चांगला खेळतो… मला असं म्हणायचं आहे की चांगला रोमान्स करू शकतो???’ श्री रेड्डीच्या या पोस्टनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. यात तिने चार्मिंग मुलगी असा उल्लेख केलेली अभिनेत्री चार्मी कौर असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, श्री रेड्डी हिच्या आरोपांवर अद्याप सचिन तेंडुलकर आणि चार्मी कौर यांच्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. या पोस्टनंतर सचिनच्या चाहत्यांनी श्री रेड्डी हिला ट्रोल केले आहे. यापूर्वी देखील श्री रेड्डीने हिने सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेकांवर निशाणा साधला आहे. पवन कल्याण, निर्माता सुभाष बाबूचा मुलगा अभिराम दग्गुबती आणि अभिनेता विशाल यावरही तिने आरोप केले आहेत.