शाहरूखकडून बदला चित्रपटाचा ‘पोस्टर’ जारी, तापसी आणि बिग बी प्रमुख भुमिकेत

14


सामना ऑनलाईन । मुंबई

सुजॉय घोष दिग्दर्शित बदला चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भुमिका आहे. ‘माफ कर देना हर बार सही नही होता’ अशी खणखणीत टॅगलईन पोस्टरवर आहे. शाहरुख खानने या चित्रपटाचा पोस्टर आपल्या ट्विटरवरून शेअर केला असून ‘अब महौल कुछ बदला-बदला सा लग रहा है’ अशी कॅप्शनही दिली आहे. तसेच यापूर्वी शाहरूखने अमिताभ बच्चन यांना “बिग बी मै आपसे बदला लेने आ रहा हू तयार रहिएगा असे ट्विट केले होते.

शाहरुख खानने या चित्रपटाची निर्मिती केली असून पिंक नंतर अमिताभ आणि तापसी पुन्हा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित होणार असून चित्रपट ८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या