दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

सामना ऑनलाईन । पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा ऑमलाईन निकाल येत्या उद्या १३ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरत होती, अखेर राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या अफवांना पूर्ण विराम मिळाला आहे.

दरवर्षी दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो, यंदा निकाल जाहीर होण्यास एक आठवडा विलंब झाला आहे. त्यामुळे आपल्याला किती टक्के गुण मिळाले याबाबतची विद्यार्थ्यांमध्ये उत्सूकता ताणली गेली आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी १४ लाख विद्यार्थीनी मंडळाकडे आवेदन पत्रे भरली होती. राज्य शासनाने अध्यादेश काढून चित्रकला, संगीत आदी कला विषयांच्या गुणांचा समावेश दहावीच्या गुणपत्रिकेत करण्याचा निर्णय घेतला. ऐनवेळी कलगुणांची नोंद करावी लागल्याने दहावीचा निकाल लावण्यास विलंब लागल्याचे सांगण्यात येत आहे.

या संकेतस्थळांवर पाहा निकाल –

www.mahresult.nic.in

http://result.mkcl.org

mh-ssc.ac.in

http://m.rediff.com/exam_results