चंदगड तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.३५ टक्के

सामना प्रतिनिधी । चंदगड

मार्च २०१७ मध्ये झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज आनलाईन जाहीर झाला. दहावी परीक्षेचा चंदगड तालुक्याचा निकाल ९७.३५ टक्के लागला. तालुक्याच्या एकूण ७२ माध्यमिक विद्द्यालयामधून २९१२ विद्यार्थ्यी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २८३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ७२ पैकी ३५ विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. एन एस पाटील माध्यमिक विद्यालय होसूर या विद्यालयाचा तालुक्यात सर्वात कमी ६६.६६ टक्के निकाल लागला. मागील वर्षी चंदगड तालुक्यामध्ये ३५ विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला होता. यावर्षी ३६ विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.

परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एक वाजता ऑनलाईन पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेट कॅफे, संगणक प्रशिक्षण केंद्रे, महा ई सेवा केंद्र या ठिकाणी गर्दी केली होती. सध्या स्मार्टफोनचे युग असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरच निकाल पाहणे पसंद केले. गेल्या वर्षी 35 माध्यमिक विद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला होता. यावर्षी मात्र एक विद्यालयाची यामध्ये भर पडली. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही निकालाची परंपरा राखण्यास तालुक्यातील माध्यमिक विद्यालयांना यश आले.