वाहनाने कट मारल्याने बस उलटली, ११ जण जखमी


सामना ऑनलाईन । पालघर

पालघर जिल्ह्यातील सफाळे जवळ एस टी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील ११  प्रवासी जखमी झाले आहेत. समोरून येणाऱ्या वाहनाने कट मारल्याने ही बस उलटल्याचं प्राथमिक वृत्त आहे. टेंभीखोडावे – सफाळे दरम्यान धावणाऱ्या या बसला मांजुर्ली येथे हा अपघात  झाला. सुदैवाने रस्त्याच्या कडेला झाड असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. अपघातावेळी  बसमध्ये ६० पेक्षा जास्त प्रवासी होते, ज्यातील ११  प्रवासी जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी सफाळे येथील ग्रामीण रुग्णालयात  दाखल केले आहे.