VIDEO: तिकीटाच्या वादातून कंडक्टरला जबर मारहाण

सामना ऑनलाईन । अकोला
अकोला जिल्हयातल्या तेल्हारा तालुक्यातील आरसुळ फाट्यावर शनिवारी किरकोळ कारणावरून एका बस कंडक्टरला टोळक्याने मारहाण केली आहे. सागर मेटांगे असे मारहाण झालेल्या कंडक्टरचे नाव आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध तेल्हारा पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


style=”text-align: justify;”>शनिवारी तेल्हारा आगाराची बस अकोल्याहून तेल्हारा येथे जात असताना कारंजा येथून एक विद्यार्थी बस मध्ये चढला. यावेळी कंडक्टर मेटांगे यांनी या विद्यार्थ्याला टिकिट काढायला सांगीतले असता त्याने हाफ तिकिटाचे पैसे दिले. मात्र कंडक्टर मेटांगे यांनी त्याला फुल तिकीट काढायला लागेल असे सांगीतल्याने दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. काही वेळाने बस आडसुळ फाटा येथे आली असता तो विद्यार्थ्याने आपल्या साथीदारांसह कंडक्टर व ड्रायव्हरला बसच्या खाली खेचून शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी काही नागरिकांनी याबाबत तेल्हारा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी धीरज नवलकर, देवानंद नवलकर, तानाजी खंडारे व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.