स्टॉक मार्केट SMS Scam: प्रत्येक डिमॅट अकॉउंट धारकाने वाचावा असा ब्लॉग!

फाईल फोटो

mahesh-chavan-th>> महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)

गेल्या काही महिन्यापासून मला माझ्या जवळपास ४०-५० ग्राहकांनी कोणी फोन करून कोणी SMS करून येत असलेल्या SMS बद्दल विचारले. हा मला SMS आला आहे आणि त्यात लिहले आहे …

” DONT MISS THIS GOLDEN OPPORTUNITY”
“खरेदी करा….खरेदी करा….. खरेदी करा
XYZ कंपनी चे शेअर्स खरेदी करा
कंपनी ला मोठा नफा झाला आहे ….
हे संधी सोडू नका…..
५०० शेअर्स तरी खरेदी करा…..
शेअर्स चा भाव येत्या काही काळातच दुप्पट होणार आहे.
अश्या पद्धतीचे SMS डिमॅट अकाउंट धारकाला येणे हि आमच्यासाठी साधारण गोष्ट आहे पण जेव्हा जेव्हा लक्षात आले कि याचे प्रमाण वाढले आहे आणि यासाठी आपल्या ग्राहकांना, शेअर्स बाजारात प्रवेश करणाऱ्या नवीन डिमॅट धारकांना सावध करण्यासाठी आजचा हा ब्लॉग म्हणा किंवा या घोटाळे बहाद्दरचा भविष्यातील डाव मोडून काढण्यासाठी केलेली खटाटोप समजा. कारण आपण ज्या क्षेत्रा मध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये होणारी लुबाडणूक पहिली की तळपायाची आग मस्तकात जाते. या अजात शत्रूला विरुद्ध लढण्यासाठी हा लेख तुम्हाला आवडल्यास फक्त एक करा तुमच्या मित्र-परिवारातील, कार्यालयीन सहकारी, नातेवाईक ज्यांची डिमॅट अकाउंट आहेत त्या व्यक्ती बरोबर हा लेख शेअर करा. कारण सावध करण्याने सुद्धा भविष्यातील हानी आपण टाळू शकतो.

कृपया लक्षपूर्वक वाचा (वाचताना सोबत calculator, पेन आणि एक कागद असेल तर उत्तम…)

डिमॅट अकाउंट धारकाला वरील प्रमाणे SMS येणे हे सामान्य बाब आहे. हे SMS खूप आकर्षक असतात.

खरेदी करा… खरेदी करा …खरेदी करा
ही संधी सोडू नका
येत्या काही महिन्यातच भाव दुप्पट
खूप सारे छोटे-मोठे गुंतवणूकदार या आकर्षक SMS च्या जाळ्यात कसे अडकतात आणि हे गौडबंगाल चालवणारे कसे मोठा पैसा घेऊन जातात ते बघूया

टीप :- पुढे सर्व किंमती आणि माहिती हि काल्पनिक आहे

स्टॉक ऑपरेटर शेअर्स कसे गळ्यात मारतात ते पाहूया…..

समजा XYZ कंपनीचा शेअर्स १०० रुपये आहे

कंपनीचे एकूण शेअर्स :- ५० लाख
ऑपरेटर/ कंपनी च्या मालकाचे शेअर्स :- ४७. ५० लाख
सामान्य गुंतवणूकदारचे शेअर्स :- २. ५० लाख

हा शेअर्स एका सरळ रेषेत १०० रुपया वरून ११०-१२० रुपयांपर्यंत आणला जातो आणि हे ऑपरेटर्स ना अगदी सोपे असते कारण त्यांच्याकडे जवळपास ९०% पेक्षा जास्त शेअर्स असतात

हे शेअर्स वरच्या किमतीला सामान्य लोकांच्या गळ्यात मारणे हेच यांचे ध्येय असते….

छोट्या गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी खरेदी-विक्री आधीच जोमात चालू केलेली असते…

त्यानंतर या कंपनी चे विभाजन जाहीर केले जाते याला SPLIT ऑफ शेअर्स बोलले जाते.

SPLIT ऑफ शेअर्स समजा १०:१ असे असेल तर या नंतर ची परिस्थिती

कंपनीचे एकूण शेअर्स :- ५ करोड
ऑपरेटर/ कंपनी च्या मालकाचे शेअर्स :- ४. ७५ करोड
सामान्य गुंतवणूकदारचे शेअर्स :- २५ लाख
शेअर्स ची किंमत :- रुपये १०
आता इथूनपुढे कसा खेळ चालू होतो पहा…..

लक्षपूर्वक वाचा…..!

SPLIT झाल्यानंतर १० रुपयाचा शेअर्स पुढच्याच काही १-२ आठवड्यात १० वरून १२-१३-१४ पर्यंत नेला जातो ( हे ऑपेरेटर्स ना सहज शक्य आहे )

शेअर्स १० वरून जेव्हा १२-१३-१४ वर अप्पर सर्किट मारत जातो तेव्हा याबाजारात या शेअर्स बद्दल चर्चा चालू होते.

थोड्याच दिवसात शेअर्स १५-१६ पर्यंत नेला जातो

***आता हे ऑपेरेटर्स ची टीम काय करते ****बाजारात उपलब्ध असलेले BULK SMS चे पॅक घेतले जाते

या BULK SMS चा प्रत्येक SMS साठी चा दर ०. १० पैसे आहे जवळपास

या ऑपेरेटर्स नि १ करोड SMS चा पॅक जरी घेतला तरी त्यासाठी त्यांना ३ लाख रुपये लागतात10000000 * 0.10 = 10 लाख

या BULK SMS पॅक च्या खरेदी नंतर

ऑपरेटर लॉबी मार्केट मधून डेटा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून डिमॅट अकाउंट होल्डर्स आणि त्यांचे मोबाईल नंबर घेते

डिमॅट होल्डर चा मोबाइलला नंबर मिळवल्यानंतर हे लॉबी एक आकर्षित SMS तयार करते आणि या कंपनी चे शेअर्स खरेदी करा हे सांगितले जाते

SMS चे उदाहरण :

BUY BUY BUY XYZLTD. @ MARKET PRICE Of 16 Target In 1 Month Is 30 Rs.
JUST BUY BUY BUY Dont Miss The Stock.
BUY Only Small Quantity Of 300 – 500 Shares , Fast Fast Dont Miss The Opportunity.
Sender : TM – ***** , AD – *****

{ SMS Sender Is Always Unknown }

हा SMS जवळपास २५ लाख डिमॅट होल्डर्स ना पाठवला जातो (फक्त डिमॅट अकाउंट होल्डर्स ना हा SMS पाठवला जातो

आणि पुढच्या ३-४ दिवसात हा मेसेज २५ लाख लोकांना ३-४ वेळा पाठवला जातो

25 लाख * 4 वेळा sms = 1 करोड { जे Web SMS Services कंपनी कडून विकत घेतलेले असतात }

याचे Calculation बघूया : :

हे stock operator एकदम आकर्षक sms 25 लाख लोकांना पाठवतात { जवळपास ४ वेळा }

१. २५ लाख लोकांना हा मेसेज मिळतो
फक्त ७०% लोक हा मेसेज वाचतात.
३०% लोक हा मेसेज डिलिट करतात
असे समजू 25 लाख * 70 % = 17. 50 लाख

मेसेज वाचणाऱ्याची संख्या = 17.50 लाख

2. यातील फक्त २५% सक्रिय अकाउंट होल्डर्स आहेत असे समजू

1750000 * 25 % = 437500 सक्रिय अकाउंट होल्डर्स

या SMS कडे आकर्षित झालेले ची संख्या = 437500 Users

3. यातील ३०% हा शेअर्स खरेदी करायचा विचार करतात

437500 * 30% = 131250 Users हा शेअर्स खरेदी करायचा विचार करतील

हा शेअर्स खरेदी करायचा विचार करणारे ३००-४०० शेअर्स खरेदि करूया असा निर्णय घेतात कारण नुकसान झाले तरी होऊन होऊन किती होईल तर एक ३०००-४००० रुपये पण दुप्पट झाले तर ८०००-१०००० मिळतील म्हणून ते आंधळी किंवा लॉटरी काढल्या सारखी रिस्क घेतात….!

हे शेअर्स खरेदी करणारे यांच्या कडे या sms शिवाय या कंपनी ची कोणतीच माहिती नसते

हे गुंतवणूकदार सरासरी ३५० शेअर्स खरेदी करतात असे जरी पकडले

131250 ( USERS ) * 350 ( Share Quantity ) = 45937500

{ म्हणजे जवळपास ४.७५ करोड शेअर्स हे १. ३१ लाख होल्डर्स खरेदी करतात }

फक्त त्या एका आकर्षक SMS च्या मेसेज मुळे हे शेअर्स गळ्यात मारलेले असतात
महत्वाचे गणित आपण बघूया :

विभाजनाच्या नंतर कंपनी मध्ये कशी शेअर होल्डिंग होती

कंपनीचे एकूण शेअर्स :- ५ करोड
ऑपरेटर/ कंपनी च्या मालकाचे शेअर्स :- ४. ७५ करोड
सामान्य गुंतवणूकदारचे शेअर्स :- २५ लाख
आणि या आकर्षक SMS च्या नंतर
कंपनीचे एकूण शेअर्स :- ५ करोड
ऑपरेटर/ कंपनी च्या मालकाचे शेअर्स :- २५ लाख
सामान्य गुंतवणूकदारचे शेअर्स :- ४. ७५ करोड
सर्व शेअर्स या सामान्य गुंतवणूकदारांच्या गळ्यात मारल्यानंतर
ऑपरेटर/ कंपनी च्या मालकाचे शेअर्स :- २५ लाख
सामान्य गुंतवणूकदारचे शेअर्स :- ४. ७५ करोड ते हि वरच्या भावात

आणि जेव्हा सामान्य गुंतवणूकदार कडे ४. ७५ करोड शेअर्स येतात तेव्हा शेअर

खाली खाली खाली खाली यायला लागतो

हे पाहत राहण्याशिवाय त्यांना काहीच पर्याय नसतो कारण सौदे खूप कमी होतातकारण इथे फक्त विक्री करायला सर्वजण असतात घेणारे कोणीही नसते कारण BULK SMS पॅक कधीच संपलेला असतो मला खात्री आहे या लेखाच्या माध्यमातून मी शेअर बाजारातील अशी काळी बाजू मांडली आहे कि हा लेख वाचून तुम्ही सावध झालात आणि भांविष्यात अश्या प्रकारचा एखादा sms तुम्हला येईलच तेव्हा काळजी घ्या.

सावध रहा……. सतर्क रहा…. आणि वरील ब्लॉग जास्तीत जास्त डिमॅट होल्डर्स पर्यंत पोहचवा.

महतवाची टीप :-

वरील सर्व माहिती कोणत्या ही शेअर्स संबंधी नाही तर जास्तीत जास्त लोकांना कळावे म्हणून सोपे केलेले calculation आहेत काही जण जे शेअर बाजारला जुग्गार म्हणतात ते तर हा ब्लॉग वाचून त्यांचे मत कसे बरोबर आहे ते लोकांना पटवून देतील. त्यांच्यासाठी एकच सांगणे आहे. वरील ब्लॉग हा शेअर बाजारातील चोर कंपन्याचा डाव उधळवून लावण्यासाठी आहे. पण याच शेअर बाजारात रतन टाटा, नारायण मूर्ती, अजीज प्रेमजी अशी चांगली लोकं ही आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणुकदारांना करोडपती केले आहे.

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. ई-मेल आयडी: [email protected]

टीप- शेअर बाजारात गुंतवणूक हा जोखमीचा विषय आहे. लेखातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाव्यतिरिक्त स्वत: खात्री केल्याशिवाय गुंतवणूक करु नये, गुंतवणुकीत तोटा सहन करावा लागल्यास आम्ही जबाबदार नाही.