भारत पेट्रोलियम, महिंद्राची आगेकूच

50

सामना ऑनलाईन । मुंबई

विक्रोळी येथील कन्नमवार नगरमधील रवींद्र म्हात्रे क्रीडांगणात व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुरू असून या स्पर्धेला दणदणीत प्रतिसाद लाभत आहे. पुरुष गटात भारत पेट्रोलियम, महिंद्रा, मुंबई मनपा, एअर इंडिया संघांनी आगेकूच केली. तसेच महिला गटात देना बँक, डब्ल्यूटीएई इफ्रा, मुंबई मनपा, विजश्री प्रोसेस यांनी विजयी चढाई केली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच स्वराज्य प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे शिबीर आजपासून

हिंदुस्थानी हौशी कबड्डी महासंघ, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तसेच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 28 ते 31 जानेवारी या कालावधीत रोहा, रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राचा संघ निवडण्यासाठी 30 संभाव्य खेळाडूंची निवड करण्यात आली असून अलिबाग-रायगड येथे उद्यापासून सराव शिबीराला सुरुवात होणार आहे. या शिबिरातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या अंतिम 12 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई शहरच्या तीन तर मुंबई उपनगरच्या दोन खेळाडूंना निवडण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या