एसटीतील दीड हजार कनिष्ठ कर्मचार्‍यांना अतिरिक्त वेतनवाढ

st bus

सामना ऑनलाईन । मुंबई

एसटीच्या दीड हजार कनिष्ठ कर्मचार्‍यांना अतिरिक्त वेतनवाढ देण्यात येणार आहे. एसटीच्या सेवेत तीन वर्षांपेक्षा जास्त व पाच वर्षांपेक्षा कमी कालावधी असलेल्या कर्मचार्‍यांना दोन वाढीव वेतनवाढीऐवजी चार वेतनवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळावर 2 कोटी 62 लाख रुपये एवढा आर्थिक भार पडणार आहे.

बडतर्फीच्या नोटीसविरुद्ध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या सर्व केसेसमध्ये व गंभीर बाबी वगळून बडतर्फीच्या नोटीस मागे घेण्याचाही निर्णय घेतला आहे. कामगार व औद्योगिक न्यायालयात प्रलंबित असलेल्या अन्य प्रकरणांची छाननी करून प्रकरणे मागे घेण्यात येतील. यात गुणवत्तेनुसारही विचार करण्याच्या सूचनाही एसटी महामंडळाने आज झालेल्या बैठकीत संबंधित विभागाला केल्या आहेत.