लैंगिक अत्याचाराबाबत असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना महिला आयोगाची नोटीस

3

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

राजुरा (चंद्रपूर) येथील आदिवासी वसतिगृहातील लैंगिक शोषण घटनेप्रकरणी असंवेदनशील वक्तव्य केल्यासंदर्भात राज्य महिला आयोगाने काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर आणि माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांना आज नोटिस बजावली. त्यांना 30 एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात एका वसतीगृहातील लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाबाबत बोलत असताना काँग्रेसच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षाने अत्यंत संतापजनक आणि लाज आणणारे विधान केले आहे. 3-5 लाखांच्या मदतीसाठी पॉस्को तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे लाजिरवाणे विधान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी केले आहे.