फॅशन करा पण जरा जपून

50

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
जर तुम्हाला फॅशन करण्याची आवड असेल, हाय हिल सँण्डल, स्लिम बॉडी फीट कपडे यांचे तुम्ही शौकीन असाल तर वेळीच सावध व्हा. कारण फॅशनमधून मिळणाऱ्या या आनंदाचे पुढे जाऊन मोठ्या समस्येत रुपांतर होऊ शकते. हाय हिल्समुळे पायाचे दुखणे वाढते तर तंग व घट्ट कपड्यांमुळे शरीरातील मांसपेशी दाबल्या जातात. ज्याचा थेट परिणाम रक्ताभिसरण प्रक्रियेवर होतो. ज्यामुळे भविष्यात मोठ्या समस्या निर्माण होतात. अशी माहिती ग्रीनपीस या स्वसंसेवी संस्थेने आपल्या अहवालात दिली आहे.
सुंदर आकर्षक दिसण्यासाठी हल्ली बरेच तरुण- तरुणी ब्रॅण्डेड कंपन्याच्या तंग जीन्स इतर कपडे घालतात. ते त्यांना शोभूनही दिसतात. पण या तंग कपड्यांमुळे मांसपेशी आवळल्या जातात. यामुळे जितका वेळ हा तंग पेहराव शरीरावर असतो तितका वेळ रक्ताभिसरण प्रकियेचा वेग मंदावतो. अंग दुखु लागते. चक्कर, मळमळणे. हाता पायाला मुंग्या येणे यासारखा त्रास अचानक होवू लागतो.
काही परदेशी कंपन्या आपल्या कपड्यांचे रंग वेगळे दिसावे यासाठी ठराविक रसायने असलेल्या कापडापासून कपडे तयार करतात. ज्याचा थेट परिणाम त्वचेवर होतो. त्वचेंवरील सूक्ष्म छित्रातून घामावाटे या कपड्यांचा रंग नकळत आपल्या शरीरात जातो. ज्यामुळे हार्मौन्सशी संबंधित विकार होवू शकतात. कॅन्सरही होवू शकतो.
हाय हिल्समुळे मणक्यावर ताण येतो. पाय़ व गुडघे दुखी सुरु होते. यामुळे फॅशन करताना सावध राहावे.

आपली प्रतिक्रिया द्या