‘इथे’ जेलमध्येही कुटुंबासोबत राहता येते

सामना ऑनलाईन । मॅड्रिड (स्पेन)

स्पेनची राजधानी मॅड्रिडपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेले आरांजुएल कारागृह कैद्यासाठी स्वर्ग ठरले आहे. या कारागृहात ३६ फॅमिली सेल तयार करण्यात आले असून येथे कैद्यांना कुटुंबासोबत राहायला मिळते.

जेल म्हटले तर अनेकांच्या डोळ्यांसमोर अंधारकोठडी, बेचव जेवण, कष्टाचे काम डोळ्यांसमोर उभे राहते, पण स्पेनमधील हा कारागृह याला अपवाद आहे. जर आई-वडील दोघेही कैदी असतील तर त्यांच्या मुलांची गैरसोय होऊ नये, त्यांना आई-वडिलांसोबत राहता यावे, यासाठी या जेलची निर्मिती करण्यात आली आहे.