स्ट्रीप क्लबमध्ये नको ते केलं, ट्रम्पना अडचणीत आणणारी पॉर्नस्टार अटकेत 

सामना ऑनलाईन । मुंबई

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा गौप्यस्फोट करणाऱ्या पॉर्नस्टार स्टेफनी क्लिफर्ड उर्फ स्टॉर्मी डॅनियल्स हिला अटक करण्यात आली आहे. स्टेफनी हिला कोलंबस येथील एका स्ट्रीप क्लबमध्ये आलेल्या एका व्यक्तीला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला म्हणून तिला अटक करण्यात आली आहे. स्टेफनीचे वकील मायकल एवेन्ट्टी यांनी याबाबत माहिती दिली असून त्यांनी हा राजकीय सूडातून स्टेफनीला अटक केल्याचे म्हटले आहे.

स्टेफनी ही अमेरिकेतील वेगवेगळ्या स्ट्रीप क्लबमध्ये काम करते. या क्लबमध्ये परफॉर्म करताना एखाद्या प्रेक्षकाला स्टेजवर बोलवून त्याच्यासोबत नको ते चाळे करण्यासाठी स्टेफनी फार प्रसिद्ध आहे. तिच्या या नको त्या चाळ्यांनीच यावेळेस तिला अडचणीत आणले असून एका प्रेक्षकाने तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी स्टेफनीला अटक करण्यात आली आहे. स्टेफनीच्या वकीलांनी तिच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले असून लवकरच तिची जामीनावर सुटका करू असे सांगितले आहे.