हा विचित्र समुद्री जीव कोणता आहे माहिती आहे का ?

सामना ऑनलाईन, टेक्सास

अमेरिकेमध्ये आलेल्या हार्वे चक्रीवादळामुळे एक विचित्र समुद्री जीव टेक्सासच्या समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेला आहे. हा जीव पहिल्यांदाच समुद्रकिनाऱ्यार बघायला मिळालाय, त्यामुळे त्याचं नाव काय आणि तो किती भयंकर आहे याची उत्सुकता तिथल्या लोकांमध्ये निर्माण झाली होती. प्रीती देसाई ही देखील अशा उत्सुक लोकांमध्ये होती, तिने या विचित्र जीवाचे फोटो काढले आणि ट्विटरवरून शेअर केले. तिने प्रश्न विचारला की या जीवाबद्दल कोणाला काही माहिती आहे का ?

प्रीती देसाई हीच्या ट्विटवर केनिथ टिघे नावाच्या समुद्रीजीव तज्ञाने सविस्तर उत्तर दिलं. त्याने टिघे यांनी सांगितलं की हा समुद्री जीव अत्यंत अणुकुचीदार दात असलेला आणि अत्यंत हिंस्त्र अशी स्नेक ईल आहे. गार्डन किंवा कांगर जातीचा ईल मासा असावा असं टिघे यांचं म्हणणं आहे. अत्यंत खोल समुद्रात राहणारा हा मासा हार्वे चक्रीवादळामुळे किनाऱ्यावर आला असावा असा संशय आहे.