चर्चेची गाडी सुरुच, २ दिवसांत ४४ कोटींचा तोटा

सामना ऑनलाईन, मुंबई

एसटीच्या कर्मचाऱयांनी सातव्या वेतन आयोगासाठी पुकारलेला संप दुसऱया दिवशीही कायम असून अद्यापही संपावर तोडगा निघालेला नसून दोन दिवसांत महामंडळाला तब्बल ४४ कोटींचे आर्थिक नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे. सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी मान्यताप्राप्त संघटनेने १६ ऑक्टोबर मध्यरात्री १२ वाजल्यापासून पुकारलेल्या बेमुदत संपामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून प्रवाशांनी खासगी बस वाहतुकीचा आधार घेतला आहे. दरम्यान, संपामुळे खासगी बस वाहतूकवाल्यांनी आपले दर वाढवून सामान्य नागरिकांची लूट सुरू केली आहे.

एसटी महामंडळातील कर्मचारी संघटनांनी सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी, सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहेत. संपाचा तिढा संपुष्टात येत नसतानाच खासगी वाहतूकदारांनी आपले दर वाढविले आहेत. राज्यात दररोजच्या ५७ हजार फेऱयांपैकी पहिल्या दिवशी २८ बसेस धावल्या, तर आज केवळ सात बसेस चालवण्यात आल्या. या दोन दिकसांच्या संपामुळे एसटीचे सुमारे ४४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अनुमान आहे. या संपात कोणताही समेट होत नसल्याचा फटका राज्यात एसटीवर अवलंबून असणाऱया लाखो प्रवाशांना सोसाका लागला आहे.

दुर्गम भागात सेवा देणाऱया एसटीची भरवशाची सेवा नसल्याने  दिवाळीतप्रवाशांची गैरसोय झाली. मुंबई ते ठाणे, भिकंडी, नाशिक, पुणे आदी मार्गांकर एसटीने जाणाऱया प्रवाशांची संख्या मोठी आहे, पण दिवाळीतच संप झाल्याने प्रवाशांना रिक्षा, टॅक्सी, रेल्के, बसेस, खासगी काहनांनी प्रवास करावा लागत आहे. एसटीच्या भरकशाकर आगाऊ आरक्षण केलेल्यांची मंगळवारप्रमाणेच बुधवारीही हाल झाले. अशातच अनेक खासगी बसवाहतूकदारांनी दिवाळीतदर वाढवल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे.

तिढा कायम…चर्चा सुरूच!

संप मिटविण्यासाठी  मुंबई सेंट्रल मुख्यालयात कृती समितीचे पदाधिकारी आणि प्रशासनातर्फे आज चर्चेच्या फेऱया सुरू होत्या. महामंडळाचे उपाध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, कृती समितीचे नेते संदीप शिंदे, हनुमंत ताटे आदींचा समावेश होता. सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत अनेक बैठका झाल्या तरी त्यातून मार्ग निघालेला नाही.

आंदोलनकाळात एसटी कर्मचाऱयाचा मृत्यू

नगर जिह्यातील अकोले डेपोतील धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या एकनाथ वाकचौरे या ५२ वर्षीय कंडक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आंदोलनादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. ते मूळचे संगमनेरचे होते.