जपानला भूकंपाचा जबर हादरा, ३ ठार २०० जखमी

सामना ऑनलाईन । टोकिओ

जपानच्या ओसाका शहराला भूकंपाचा जबर धक्का बसला असून यामध्ये ३ जण ठार तर २०० हून अधिक जण जखमी असल्याचं वृत्त आहे. ६.१ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप असला तरी त्सुनामी धडकण्याची शक्यता नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, जपानमधील सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले असून अणूऊर्जा प्रकल्पांना मात्र कोणताही धोका नसल्याचं सांगण्यात आलं आहे.