बारावीच्या विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू

2

सामना प्रतिनिधी । नगर

शहरातील महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा काल सकाळी अपघातात मृत्यू झाला. कालिका भगवान नेमाणे (वय 18, रा. कायनेटिक चौक, नगर) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. या अपघातात भगवान नेमाणे किरकोळ जखमी झाले आहेत.

नगरपुणे महामार्गावर शिल्पा गार्डन येथे गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. कालिका नेमाणे वडिलांबरोबर दुचाकीवरून नगरकडे महाविद्यालयात येत होती. त्याचवेळी त्यांच्या गाडीला अपघात होऊन त्यात कालिका गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी एका जवळच्या खासगी हॉस्टिपटलमध्ये दाखल करण्यात आले होते; परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नेमाणे हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात.