लोकलच्या दारात उभे राहून विद्यार्थ्यांनी केले स्टंट्स, व्हिडीओ व्हायरल

सामना ऑनलाईन । चेन्नई

तामिळनाडूतील लोकलमध्ये काही विद्यार्थी जीवघेणे स्टंट करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे विद्यार्थी अंबत्तूर आयटीआय इन्स्टिट्यूटचे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.

आयटीआयचे हे विद्यार्थी गुरुवारी चेन्नईहून थिरवल्लूर येथे जात होते. त्यावेळी जवळपास सहा विद्यार्थी लोकलच्या एकाच दरवाजावर लोंबकळत होते व त्यातील काही जण खिडक्यांवर व दारांवर चढलेले देखील या व्हिडीओत दिसत आहेत. सेल्वम सारावनन या ट्विटर युझरने त्यांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

मुंबईत हार्बर रेल्वे मार्गावर अनेकदा असे जीवघेणे स्टंट करणाऱ्या तरुणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मुंबईत अनेकदा अशी स्टंट करणाऱ्यावर कारवाई देखील झाली आहे.