ऑनलाइनमध्ये मिळालेले कॉलेज नापसंत, विद्यार्थ्यांना हवीय नवी ‘प्राधान्य फेरी’

सामना प्रतिनिधी, मुंबई

अकरावी प्रवेशाच्या फेऱ्यांमध्ये मिळालेले कॉलेज पसंत नसलेल्या विद्यार्थ्यांना रविवारपासून सुरू झालेल्या प्रथम प्राधान्य फेरीत कॉलेज बदलाची संधी हवी आहे. अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात धाव घेतली असून प्रथम प्राधान्य फेरीसाठी नव्याने ऑनलाइन अर्ज करता येईल का, याची चौकशी ते करीत आहेत. मात्र एकदा मिळालेला प्रवेश रद्द करून नव्याने अर्ज करता येणार नाही, अशा सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयातून देण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत प्रवेशापासून वंचित असलेल्या तीन हजार ८३ विद्यार्थ्यांसाठी ‘प्रथम अर्ज त्याला प्रवेश’ या तत्त्वावर रविवार, २० ऑगस्टपासून प्रवेशफेरी सुरू करण्यात आली आहे.