स्मार्ट आजी-आजोबांसाठी स्मार्ट चष्मा हवाच

रश्मी चौबळ । ऑप्टिशियन

स्मार्ट आजी-आजोबा… त्यांच्या स्मार्ट, रुबाबदार दिसण्यात चष्म्याचा वाटा मोठा असतो. आज चष्मा केवळ गरज म्हणून लावला जात नाही, तर त्यातून आपले व्यक्तिमत्त्व उठावदार दिसेल, भारदस्त दिसेल याची जाणिवपूर्वक काळजी घेतली जाते. या वयात डोळ्यांच्या समस्या जरा जास्त सतावतात. त्यामुळे चष्मा स्टायलीश असण्यापेक्षा ज्येष्ठांचं लक्ष त्यातून छान वाचता यायला हवं याकडे असतं. पण त्यातूनही आजचे काही ज्येष्ठ नागरीक चष्मा स्टायलीश असावा यावरही भर देऊ लागले आहेत. बऱयाचजणांना या वयात जास्त प्रकाश सहन होत नाही. त्याचेही निराकरण या चष्म्याद्वारे होणे गरजेचे असते.

स्टायलीश चष्मा घेण्याआधी सर्वात महत्त्वाची असते ती डोळ्यांभोवती असलेल्या त्वचेची काळजी… डोळ्यांखालील काळी वर्तुळे हसताना स्पष्ट दिसतात. ती झाकण्यासाठी तसेच तेथील त्वचा सूर्यकिरणांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी स्टायलीश चष्मा लावणे गरजेचे ठरते. अशा प्रकारचे चष्मे थोडे मोठय़ा आकाराचे असल्याने पूर्ण डोळ्यांबरोबरच भुवयादेखील झाकल्या जातात. असे चष्मे घ्यायचे तर साधारणपणे क्लासिक सोफिया लॉरेन किंवा टर्मिनेटर या ब्रॅण्डचे घ्यायचे. त्यामुळे त्वचाही सुरक्षित राहाते. कोणत्याही प्रकारच्या स्टाईलचा चष्मा घेतला तरी त्याद्वारे सूर्याच्या यूव्हीए आणि यूव्हीबी किरणांपासून १०० टक्के बचाव होतोय की नाही हे पाहून घेतले पाहिजे.

ठरावीक वयानंतर मोतीबिंदू होण्याची शक्यता वाढते. मात्र स्टायलीश चष्मा वापरत असाल तर तो धोका बहुतांशी टाळता येऊ शकतो. मोतीबिंदू टाळता येणं शक्य नसलं तरी त्याची वाढ कमी करता येते. या विकाराची सुरुवात वयाच्या चाळिशीनंतर काहीजणांमध्ये सुरू होते.

मात्र सूर्याच्या यूव्ही किरणांपासून डोळ्यांचा आधीपासूनच बचाव करत असाल तर मोतीबिंदूचा विकास वेगाने होत नाही आणि मोतीबिंदू काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेवेळी झटपट चांगला परिणाम दिसून येतो.

जास्त प्रकाश असल्यास काही ज्येष्ठांचे डोके दुखू लागते. पण स्टायलीश चष्मे घातले तर ही डोकेदुखी टाळता येऊ शकते. रात्रीसुद्धा खास प्रकारचे चष्मे घालायचे. आपल्या दृष्टीमध्ये अडथळा निर्माण करणाऱया मोठय़ा फ्रेम न घेता योग्य फ्रेम निवडा. स्टायलीश चष्मे महाग असतात असा गैरसमज आहे. मात्र फॅशनेबल आणि संरक्षण देणारे चष्मेही कमी किमतीत मिळू शकतात. स्टायलीश चष्मा घेताना तो यूव्हीए किंवा यूव्हीबी प्रोटेक्शन देणारा असेल यावर भर द्या.

चष्म्यातही जपा स्टाईल

 • चेहऱयाच्या त्वचेनुसार चष्म्याची योग्य फ्रेम निवडा. पांढरी किंवा सिल्व्हर शेडची फ्रेम भडक दिसेल. त्यापेक्षा सोनेरी, काळी किंवा राखाडी रंगाची फ्रेम चांगली. लाल फ्रेम खूपच फॅशनेबल वाटेल. त्यामुळे तशी फ्रेम घेऊन कामावर जाता येणार नाही.
 • ज्येष्ठ नागरिकांनी अंडाकार फ्रेमचे चष्मे गोल चेहऱयावर घातले तर ते बरे दिसणार नाहीत. चौकोनी चेहऱयांवर गोल फ्रेम चांगली वाटेल.
 • छोटय़ा छोटय़ा दुकानांमध्ये मिळणारे स्वस्त फ्रेमचे चष्मे घेऊ नका. डोळ्यांची काळजी असेल तर चांगल्या दर्जाचे सनग्लासेस खरेदी करा.
 • वय झालं असलं तरी चष्म्याची फ्रेम स्टायलीश घ्यायला हरकत नाही. चेहऱयाच्या आकारानुसार चष्मा फ्रेम घ्या. काही लोक छोटय़ा तोंडाचे असूनही मोठय़ा फ्रेमचे चष्मे लावतात.
 • चष्मा डोळ्यांवर नसेल तेव्हा तो त्याच्या केसमध्येच ठेवा. पुन्हा घालताना केसमधील मुलायम कापडाने आधी पुसून घ्या.
 • चष्म्यांवर कधीच रेघा, रॅशेस येता कामा नयेत. डोळ्यांसाठी ते चांगले नाही.
 • चष्म्यामुळे नाक आवळले जात असेल तर तो चष्मा तुमच्यासाठी योग्य नाही. अशावेळी थोडा मोठय़ा आकाराचा चष्मा घ्यावा.
 • चष्मा नेहमी व्यक्तिमत्व खुलविण्याच्या दृष्टिकोनातूनच खरेदी करा. फॅशन म्हणून सनग्लासेस घेऊ नका. जे घालून डोळ्यांना आराम मिळेल तोच चष्मा खरेदी करा.
 • झोप येत नसेल किंवा झोपेची समस्या जाणवत असेल तर दालचिनीचे दूध प्या. त्यामुळे झोपण्यापूर्वी दालचिनी घातलेले दूध प्या. त्यामुळे चांगली झोप येते.
 • रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित दालचिनी पावडर घालून दूध प्यायल्यास मुलांमधील रोगप्रतिकारशक्ती वाढते. हे दूध प्राचीन काळातही मुलांना द्यायचे. त्याने शक्ती वाढते.
 • हाडांच्या लवचिकतेसाठी दालचिनीची पूड टाकलेल्या दुधात मध टाकून प्यायल्यास हाडे लवचिक होतात. नियमित अशा प्रकारे दूध प्यायल्याने हाडे ठिसूळ होत नाहीत.
 • पचनाचा त्रास असलेल्यांनी नियमित दालचिनीची पूड घातलेले दूध प्यावे. पचन चांगले होते आणि त्यांना गॅसचा त्रासही जाणवत नाही.
 • तजेलदार त्वचा आणि चमकदार केसांसाठी दालचिनीची पूड घालून ते दूध प्यायल्याने केस आणि त्वचेसंदर्भातल्या समस्या दूर होतील.

काचबिंदूपासून संरक्षण हवे

ज्येष्ठ नागरिकांसाठी असा चष्मा हवा ज्यामुळे काचबिंदू आणि प्रकाशापासून डोळ्यांचे रक्षण करेल. काचबिंदूचे अनेक प्रकार आहेत. ज्यामुळे सर्व मज्जातंतूंचे नुकसान होते आणि कायम अंधत्व येऊ शकते. बहुतेक ग्लाकोमाची प्रगती सावकाश होत असते. औषधोपचार आणि शल्यचिकित्सक उपचार यानेही हा रोग पूर्णपणे बरा करता येत नाही. त्यामुळे आधीच योग्य प्रकारचा चष्मा घालून सावधगिरी बाळगली पाहिजे. चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी ग्लुकोमा रिसर्च फाऊंडेशनने अँटी रिफ्लेक्टिव्ह लेंस कोटिंग्स आणि एम्बर टिंट असलेला चष्मा घालण्याची शिफारस यापूर्वीच केली आहे.