१५ ऑगस्टला सोनी मॅक्स-२ वर, ‘नेताजी सुभाषचंद्र बोसः द फरगॉटन हीरो’


तुम मुझे खून दो; मै तुम्हे आजादी दूँगा, हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वाक्य आजही हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याची आठवण करून देतो. देशवासीयांमध्ये उत्साह संचारण्यासाठी आणि त्यांना स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा देण्यासाठी नेताजींची भूमिका महत्त्वाची होती. स्वातंत्र्यासाठी नेताजींनी दिलेल्या अतुलनीय लढ्याला मानवंदना देण्यासाठी ‘सोनी मॅक्स २’ वर १५ ऑगस्टला सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी ‘नेताजी सुभाषचंद्र बोस-द फरगॉटन हीरो’ हा सिनेमा दाखविण्यात येणार आहे. नाझी जर्मनीमध्ये नेताजींनी घालवलेली पाच वर्षे आणि आझाद हिंद सेनेच्या स्थापनेस कारणीभूत ठरलेल्या घटनांचा आढावा या चित्रपटात आहे.