ताम्हाणे हायस्कूलची शिष्यवृत्ती परिक्षेतील उज्ज्वल निकालाची परंपरा कायम

सामना प्रतिनिधी । देवरुख

गुरूवारी जाहीर झालेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परिक्षेच्या गुणवत्ता यादीत संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर ताम्हाणेच्या पाचवीतील चार विद्यार्थांचा समावेश आहे. तर आठवीतील प्रणव कांबळेने तालुक्यात पहिला येण्याचा मान मिळवला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ताम्हाने हायस्कूलने शिष्यवृत्ती परिक्षेतील आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा सुरु ठेवली आहे.

यावर्षी पाचवीतील ४ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले तर आठवीतील एक विद्यार्थी तालुका गुणवत्ता यादीत चमकला. पाचवीतुन श्रवण बोथले – जिल्ह्यात ५६ वा, आश्विनी झगडे – जिल्ह्यात ११९ वी, आकांक्षा मनवे – जिल्ह्यात १४९ वी, अनुज कानसरे – जिल्ह्यात १५९ वा आला. आठवीतील प्रणव कांबळेने संगमेश्वर तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थाध्यक्ष शशिकांत सप्रे, सचिव अशोक सप्रे, मुख्याध्यापक नंदकुमार परिट यांच्यासह सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले.