यशाचा स्वादिष्ट आलेख


<< परीक्षण >> << शुभांगी बागडे >>

मुंबईतल्या शिकाजी पार्कजकळचे ‘जिप्सी’ हे हॉटेल म्हणजे अनेकांचे जिव्हाळ्याचे ठिकाण. गेल्या तीन दशकांपासून या रेस्टॉरंटने खवय्यांवर मोहिनी घातली आहे. ही जादू केवळ तिथल्या पदार्थांची, चवीची नाही तर येणाऱया प्रत्येकाशी जिव्हाळ्याचं नातं जोडणाऱया राहुल लिमये यांची आहे. एका साध्या मराठी कुटुंबात जन्मलेल्या राहुल लिमये यांनी हॉटेल उद्योगात नाव मिळवत जिप्सी हे रेस्टॉरंट नावारूपाला आणलं. त्यांचा हा प्रवास मांडला आहे ‘निमित्त… जिप्सी शिवाजी पार्क’ या पुस्तकातून.

राहुल लिमये हे जिप्सीचे संस्थापक. हॉटेल उभं करताना आलेल्या अडचणी, या व्यावसायिक कारकीर्दीतले टप्पे, यानिमित्ताने जोडली गेलेली माणसं अशा केगकेगळ्या गोष्टींबाबत राहुल यांनी या पुस्तकातून संवाद साधला आहे. हे पुस्तक म्हणजे राहुल लिमये यांचे आत्मचरित्रच. त्यांच्या आयुष्यातील अनेक बारीक संदर्भही त्यांनी मांडले आहेत. यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पार्श्वभूमी अत्यंत गरीब, हलाखीच्या परिस्थितीतूनच यायला हवी असं काही नाही. तुमची वेगळ्या क्षेत्रातील आवड, अविरत मेहनत करण्याची तयारीदेखील तुम्हाला असंच यश मिळवून देते हा दाखला देत लेखकाने केलेली सुरुवात निश्चितच भावण्यासारखी आहे. घरची परिस्थिती बिकट नसली तरी कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना हॉटेलसारख्या व्यवसायात त्यांनी यश मिळवलं. या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येकाचे ऋण त्यांनी पुस्तकाद्वारे मानले आहेत. आपल्या आयुष्यातील भावनिक नात्यांचा कॅलिडोस्कोपच लेखकाने यात मांडला आहे. लहानपणीच्या क्रात्यपणापासून ते या हॉटेलच्या उभारणीपर्यंतचा प्रकास त्यांनी यात सकिस्तरपणे लिहिला आहे. हॉटेलच्या निमित्तानं अनेक दिग्गज राजकीय नेते, कलाकार आणि अशा अनेक मंडळींशी राहुल यांचा परिचय झाला. ही फुललेली मैत्री, तो जिव्हाळा यासंदर्भाने पुस्तकात ठायी ठायी व्यक्त होतो.

हॉटेल व्यवसाय हे ग्राहकाभिमुख क्षेत्र. ग्राहकाला चवींचं नावीन्य देत आपुलकीच्या नात्यानेही राहुल यांनी जोडून ठेवले. कोणत्याही व्यवसायाचे हे मुख्य सूत्र राहुल यांनी पदोपदी जपलं याचा प्रत्यय या पुस्तकातून आपल्याला येतो. हॉटेल व्यवसायाचं हे गमक त्यांनी पुस्तकाच्या सादरीकरणातूनही मांडलं आहे. याकरिता पुस्तकाचे आकर्षक भाग करण्यात आले असून त्यांना मेनूकार्डप्रमाणे ‘स्टार्टर’, ‘मेन कोर्स’, ‘गोडधोड मिठाया’, ‘मसाले-काही गोडे, काही गरम’, ‘मसाला पान’ अशी नावं दिली आहेत. आपल्या बालपणीचा काळ, हॉटेल उभं करतानाचे अनुभव मांडणारा ‘स्टार्टर’, आप्तपरिचितांशी असलेलं भावनिक नातं मांडणारा ‘गोडधोड मिठाया’, अस्सल खवय्याशी नातं सांगणारा ‘खवय्येगिरी’ व चांगल्या-वाईट अनुभवांचं वर्णन करणारा ‘मसाला पान’ हे लेखांचे भाग वाचल्यानंतर आपलंही जिप्सीशी आणि लेखकाशी वेगळं नातं तयार होतं. एखाद्याला खूश, आनंदी ठेवण्याचा मार्ग पोटातून जातो असं म्हणतात. राहुल यांनी मात्र खवय्यांच्या हृदयाचाही ठाव घेतला आहे, हे पुस्तकातील अनेकविध अनुभव व लेखातून
स्पष्ट होतं.

कोणत्याही व्यवसायातील नव्या व्यावसायिकाला प्रेरणा मिळेल असे हे पुस्तक आहे. स्वतŠला घडवताना आलेले अनुभव प्रांजळपणे मांडताना लेखकाने कुठेच अधिकउणे ठेवलेले नाही. पुस्तकाला लाभलेल्या अभिनेता नाना पाटेकरांच्या प्रस्तावनेमुळे सुरुवात अगदी बहारदार झाली आहे. व्यवसायात भावनांना स्थान नसतं असं म्हणतात, पण राहुल लिमयेंनी आपुलकीच्या भावनेने हा व्यवसाय पुढे नेला. हॉटेल व्यवसायातील आव्हानं, अनुभव मांडणारं, निश्चितच वाचावं असं  हे पुस्तक आहे.

निमित्तजिप्सी शिवाजी पार्क

लेखक  –  राहुल लिमये

प्रकाशन  – राजहंस प्रकाशन

मूल्य – २५०  रुपये, पृष्ठ – १४२