साखर स्वस्त होणार

सामना प्रतिनिधी । मुंबई

वर्षभरापासून सर्वसामान्यांसाठी कडू झालेली साखर आता स्वस्त होणार आहे. वेंâद्र सरकारने परदेशातून आयात केलेली पाच लाख मेट्रिक टन साखरेमुळे घाऊक बाजारातील प्रति क्विंटल साखरेचा दर ३९०० रुपयांवरून ३७०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. तर जीएसटीमुळे साखरेवरील सेस आणि एक्साइज ड्युटी जाऊन विंâमतीवर केवळ पाच टक्के कर लागणार आहे. त्यामुळे १ जूननंतर प्रतिकिलो साखरेचा दर ४० रुपयांच्या खाली येणार आहे.

देशात साखरेचे उत्पादन कमी झाल्याने प्रतिकिलो साखरेचा दर ४२-४३ रुपयांवर गेला होता. त्याची दखल घेत वेंâद्र सरकारने ३१ जूनपर्यंत ४० टक्के आयात शुल्क माफ करून तब्बल ५ लाख मेट्रिक साखर आयात करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणात साखर आयात झाली असून साखरेचे घाऊक दर ३७०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. परिणामी किरकोळ बाजारातील साखरेचे दर हळूहळू कमी होऊ लागले आहे. तर सध्या साखरेवर प्रति क्विंटलला १२४ रुपये सेस तर ७१ रुपये एक्साइज ड्युटी असे मिळून १९५ रुपये आकारले जातात, पण १ जुलैपासून जीएसटीमुळे विंâमतीच्या आधारावर केवळ १७० रुपये कर लागणार आहे. त्यामुळे साखरेचे दर कमी होणार आहे.

दर कमी करण्याबाबत व्यापाऱ्यांची भूमिका महत्त्वाची –

देशात सध्या १३४ लाख मेट्रिक टन साखर असून राज्यात ४० लाख मेट्रिक टनाचा स्टॉक आहे. तसेच जवळपास ५ लाख मेट्रिक टन साखर आयात झाल्याने आणि जीएसटीमुळे साखरेचे दर कमी होणार आहेत. पण कमी झालेल्या या दराचा व्यापारी ग्राहकांना लाभ होऊ देणार का हे पाहावे लागणार आहे.