ऊस आणि सिंचन साहित्य जळाल्याने शेतकऱ्यांचे 2 लाखाचे नुकसान

7


सामना प्रतिनिधी । लातूर

तालुक्यातील निवळी येथील शेतकरी संजय गोविंदराव माने यांचा गावालगत असलेला २ एकर ऊस अचानक लागलेल्या आगीमुळे जळाला आहे. याआगीमुळे त्यांचे ऊसासह शेतीतील ठिबक, पाईप व शेतीउपयोगी साहित्य जळाले आहे. यामुळे अगोदरच दुष्काळ आणि त्यात या संकटामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊसासह सर्व साहित्य जळाल्यामुळे २ लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. शेतीलगत विद्युत तार नाही, कोणतीही ज्वलनशील वस्तु नाही तरी देखील आग लागल्यामुळे अज्ञात व्यक्तीने द्वेषबुद्धीने हा प्रकार केला असल्याचा दाट संशय शेतकरी संजय माने यांनी व्यक्त केला आहे.

निवळी येथील शेतकरी संजय माने यांचा कोसी ३१०२ जातीचा ५ एकर ऊस तोडणी कार्यक्रमात आला होता. पण अचानक बुधवारी सकाळी १०.३० वाजता पेटला. यावेळी ताबडतोब विलास सहकारी साखर कारखाना आग्नीशमनने पेटलेला ऊस विझवला. यामुळे ऊर्वरीत ऊसासह अनेक शेतकऱ्यांचा ऊस वाचला आणि मोठा अनर्थ टळला. या आगीमध्ये २ एकर ऊसासह, ठीबक, पाईप व शेतीउपयोगी साहित्‍य जळाल्याने शेतकरी संजय माने यांचे २ लाखाचे नुकसान झाले आहे.

या शेतावरून विदयुत तार जात नाही, कोणत्याही स्वरूपाची आग त्या ठीकाणी नव्हती तरी देखील ऊस पेटल्याने या बददल सर्वजन शंका व्यक्त करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या