सकाळच्या रागांची मैफल रंगणार

1

सकाळच्या रागांवर आधारित निसर्गाचे प्रतिबिंब आणि ध्यानधारणा यांचे स्वरुप प्राप्त झालेली मैफील पृथ्वी थिएटर आणि पंचम निषादतर्फे येत्या रविवारी 17 फेब्रुवारी सकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. ज्येष्ठ गायक पंडित सुहास व्यास यांच्या गायनाचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. या मैफलीत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यात येणार नाही. त्यामुळे रसिकांसाठी हा अत्यंत दुर्मिळ अनुभव असेल. आपल्या शास्त्रीय गायनकलेचे पारंपरिक सौंदर्य जपण्यासाठी सुहास व्यास प्रसिद्ध आहेत. भावना हा संगिताचा आत्मा असतो, यावर व्यास यांचा विश्वास असून आयुष्यभर त्यांनी हे तत्त्व पाळले आहे. त्यांना सहकलाकार निरंजने आणि प्रसाद पाध्ये हे तबला आणि संवरसंवादिनीवर साथ देतील.