मंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न

2

सामना ऑनलाईन । मुंबई

मंत्रालय परिसरात शुक्रवारी पुन्हा एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न झाला आहे. एका वृद्ध महिलेने कर्जबाजारीपणाला कंटाळून मंत्रालयाच्या गेटसमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ महिलेला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. शारदा कांबळे असे या महिलेचे नाव असून ती चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात राहणारी आहे.तिने लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येस सावकार उदय रघु शेट्टी आणि दलाल मिना पगारे जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

मुलीच्या लग्नासाठी तिने वाशीनाका येथील उदय रघु शेट्टी या सावकाराकडून 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र कर्जाची परतफेड करूनही सावकार आणि दलाल मिना पगारे यांच्याकडून धमक्या आणि खोटे गुन्हे दाखल करून फसवणूक होत असल्याचा आरोप तिने केला आहे. सदर महिलेला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरु आहे.