१५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

भावसिंगपुरा, लालमाती येथील सागर गोरखनाथ मोटे (१५) याने रविवारी सायंकाळी राहत्या घरी साडीने गळफास घेतला. बेशुद्धावस्थेत त्यास उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

सागर हा व्यसनाधीन होता. यापूर्वीही त्याने रागाच्या भरात विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्याचे बी. एन. कुऱ्हाडे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.