सुल्तान अझलान शाह हॉकी ;हिंदुस्थानची धडाकेबाज सुरुवात

3

सामना ऑनलाईन । इपोह

हिंदुस्थानने सुल्तान अझलान शाह हॉकी स्पर्धेत विजयी सलामी देत धडाकेबाज सुरुवात केली. हिंदुस्थानने वरुण कुमार व सिमरनजित सिंह यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्या जपानचा 2-0 गोल फरकाने धुव्वा उडविला.

जपानसारख्या तुल्यबळ संघाविरुद्ध हिंदुस्थानने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाला पसंती दिली. मात्र पहिल्या क्वार्टरमध्ये उभय संघांना गोल करण्यात अपयश आले. दुसऱया क्वॉर्टरमध्ये जपानने आक्रमक खेळावर भर दिला, मात्र हिंदुस्थानने तंत्रशुद्ध खेळ करत जपानचे मनसुबे उधळून लावले. त्यामुळे हताश झालेल्या जपानी खेळाडूंनी चूक केली व हिंदुस्थानला पेनल्टी कॉर्नर मिळाला. या पेनल्टी कॉर्नरवर 24 व्या मिनिटाला वरुण कुमारने अफलातून स्ट्राइकवर गोल करत हिंदुस्थानचे खाते उघडले.

जपानने मध्यंतरानंतर लढतीत पुनरागमन करण्यासाठी आक्रमणाची धार वाढविली. मात्र पुन्हा एकदा धसमुसळय़ा खेळामुळे जपानने हिंदुस्थानला पेनल्टी बहाल केली. मात्र सुमित कुमारच्या स्ट्राइकरवर मनदीप सिंहला गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. चौथ्या आणि अंतिम क्वॉर्टरमध्ये आघाडीवर असलेल्या हिंदुस्थानचे बचावात्मक पवित्रा घेतला. मनदीपने रचलेल्या चालीकर सिमरनजित सिंहने जपानी गोलकीपर योशिकाकाला चककत 56 व्या मिनिटाला गोल करून हिंदुस्थानची आघाडी 2-0 ने वाढवून जपानला पराभवाच्या खाईत ढकलले. आता पुढच्या लढतीत रकिकारी हिंदुस्थाची गाठ दक्षिण कोरियाशी पडणार आहे.