बच्चे कंपनीसाठी समर फेस्ट

1

सामना प्रतिनिधी, मुंबई

मे महिना आणि सुट्टीचा माहौल बच्चेकंपनी व त्यांच्या पालकांसाठी एक अनोखी पर्वणी बनतोय. समर कॅम्पस, पर्यटन याबरोबरच नावीन्याच्या शोधात असणाऱयांना आता ठाणे-मुंबई येथे होणारी सर्वात मोठी ‘समर फेस्ट’ खुणावत आहे. ठाण्यातील रुस्तमजी अर्बानिया येथील लिऑन्स वर्ल्ड सेंटर येथे पूर्ण एक महिना चालणाऱया या ‘समर फेस्ट’ चा पहिला टप्पा 30 एप्रिलपर्यंत मज्जेचा व करमणुकीचा खजिना उघडणार आहे.

या फेस्टद्वारे शाळेतील मुलांना करमणुकीची व शिकण्याची संधी आहे. बास्केटबॉल, टेबल टेनिस, स्केटिंग, चेस, थिएटर व ड्रामा, संगीत, नृत्य, कॅलिग्राफी, विज्ञान प्रकल्प इत्यादी भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल आहे. या ‘समर फेस्ट’ द्वारे मुलांना व पालकांना एक कुटुंब म्हणून एकत्र आणून मुलांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करण्याचे उद्दिष्ट आहे.