उन्हाळ्यात मस्त ट्रेंडी कसं दिसावं?

>> पूजा तावरे, फॅशन डिझायनर

उन्हाळ्यात मस्त ट्रेंडी कसं दिसावं हा तरुणाईपुढे प्रश्नच असतो. उन्हाचा तडाखा, घामाच्या धारा या साऱ्यांत समर कूल कसं राहावं यासाठी सविस्तर…

हॅपी कूल समर
उन्हाळ्यात येणारा घाम,त्याचा होणारा त्रास यामुळे काहीतरी हटके फॅशन ट्राय करणे थोडेसे अवघड असते. ऋतुबदलानुसार कपड्य़ांचा अंदाज बदलत असतो. काही फॅशन अशी असते की, जी दरवर्षी फॅशन ट्रेंडमध्ये इन असते. त्यामुळे सध्याच्या गर्मीच्या सीजनमध्ये नेहमी एव्हरग्रीन असणारा फॅशनेबल ट्रेंड कूल लूक देणारा ठरत आहे.

समर क्लोथ्स
उन्हाळ्यात उष्णतेला मात देण्यासाठी आपण फिकट रंगाचे आणि सुटसुटीत कपडे निवडत असून, यामध्येसुद्धा विविध पर्याय बाजारात उपलब्ध आहे. पुरुषांसाठी उन्हाळ्यात परिधान करण्यासाठी विविध स्टाईलिश आणि क्लासी आऊटफिट उपलब्ध असून, त्याला शोभणाऱ्या ऍक्सेसरीझची निवड केल्याने हटके लूक मिळते. पार्टी लूकसाठी प्रिंटेड शर्टससारखे पर्याय उपलब्ध आहे. तसेच ट्राऊजरमध्ये वाईड लेग लिनन ट्राऊजरची क्रेझ असून, हे ट्राऊजर पार्टीत आणि कॅज्युअल म्हणून वापरता येते.

क्रॉप टॉप
सैलसर आणि सामान्य टॉपच्या तुलनेत थोडेसे शॉर्ट असणारे क्रॉप टॉपची सध्या चलती दिसृन येत आहे. जीन्स्, स्कर्ट आणि हाय व लोवेस्ट पँटवर हे आकर्षक दिसतात. क्रॉप टॉपचे वैशिष्ट म्हणजे हा प्रत्येक तरुणीला शोभून दिसतो. जीन्स् किंवा हॉट पँटवर क्रॉप टॉप चांगले दिसतात.

पेस्टल प्रिंटस्
या सीजनमध्ये पेस्टल रंगांचे ट्रांन्सपरंट, प्रिंटेड फॅब्रिक ड्रेसेस स्टायलिश दिसू शकतात. कारण हे लाईटवेट, कुल असा लुक देतात. पेस्टल कलर्समध्ये फ्लोरल प्रिंटेड टॉप, स्लीव्हलेस टॉप, शिफॉन व जॉर्जेटमधील ड्रेस ट्रेंडी आणि स्टायलिश दिसू शकतात.

प्रिंटेड शर्टस्
सध्याच्या समर सीजनमध्ये प्रिंटेड शर्टस्ला अधिक पसंती मिळत आहे. यामध्ये पाने, एबस्ट्रक्ट पॅटर्न, प्राणी, पक्षी आणि मिलेट्रीच्या डिझाईन्समुळे याला बाजारात अधिक मागणी दिसून येत आहे. त्यामुळे पूर्वी फक्त पार्टीसाठी वापरण्यात येणारी ही प्रिंटेड शर्टसची फॅशन आता ऑफिससह विविध ठिकाणी पाहायला मिळत आहे.

कूल हेअरस्टाईल्स
उन्हाळ्यात केस मोकळे सोडणे खूपच त्रासदायक असतं. त्यामुळे तरुणी केस बांधूनच ठेवतात. त्यामुळे तुमचा एक नवीन कूल लुक दिसतो. सध्या विस्पी फ्रींज कट हेअरस्टाईल पसंतीस उतरत आहेत. फ्रींज कट हेअरस्टाइलमध्ये विस्पी फ्रींज सॉलिड फ्रींज, थीक व थीन प्रिंट, लाँग किंवा शॉर्ट प्रिंट आणि साईड प्रिंट हे प्रकार दिसून येतात. समर सीजनमध्ये क्राऊन ब्रेड ही स्टाईल करून स्टायलिश दिसू शकता. या हेअरस्टाईलमुळे केस प्रदूषणापासून सुरक्षितही राहू शकतात. या उन्हाळ्यात हॉट बन, समर ब्रेडेड लुक, फ्रेंच रोल विथ व्टिस्ट, व्टिस्टेड बन, फिशटेल ब्रेड, चंकी टॉप नॉट, पोनी टेल, लोसाईड ब्रेड यांसारख्या हेअरस्टाइल्सही सोईस्कर ठरू शकतात.

स्ट्राइप
उन्हाळ्यामध्ये काळ्या आणि पांढऱया रंगांची स्ट्राइप ही फॅशन तरुण-तरुणींच्या पसंतीस उतरली आहे. मोठी स्ट्राइप्स, लहान स्ट्राइप्स, सिंगल स्ट्राइप्स, डबल स्ट्राइप्स अशा अनेक प्रकारांची फॅशन उन्हाळ्यात पाहायला मिळते.