शिवरायांचे आठवावे रूप… शिवरायांचा आठवावा प्रताप

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

आडगाव (खुर्द) येथे २० ते २८ डिसेंबरदरम्यान शिवचरित्र व्याख्यानमाला झाली. शिवरायांच्या जन्मापूर्वी परकीय शक्तींनी ग्रासलेल्या मुस्लिम पाच शाहींनी भयग्रस्त, लाचार झालेल्या समाजात जिथे खुद्द जिजाबार्इंचे सख्खे भाऊ-वडील यांना धोक्याने देवगिरीवर अचानक कत्लेआम केले गेले. अशा परिस्थितीत शिवरायांचा जन्म, शिक्षण, मावळ्यांची संगत, रायरेश्वरावर हिंदवी स्वराज्याची शपथ, रांझा पाटलाला स्त्रीच्या अन्यायासाठी केलेली शिक्षा, अफजलखान वध, शाईस्तेखानाची बोटे छाटणे, तान्हाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, जिवा महाले, शिवा काशीद, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर, कान्होजी जेधे आदी मावळ्यांचे चरित्र, सुरतेवर छापा, पुरंदरचा तह, आग्रा येथून सुटका, पन्हाळगडावरून सुटका असे शिवचरित्रातील विविध प्रसंग, व्याख्याने पूजनीय सुनील चिंचोलकर यांनी तन्मयतेने प्रस्तुत केली.

या शिवचरित्राची ‘शिवराज्याभिषेक’ प्रसंगाच्या सादरीकरणाने सांगता झाली. गावातील ३०-४० मुला-मुलींनी वेशभूषा धारण करून हा प्रसंग सादर केला. जात,पक्ष, भेद हे सर्व विसरून आडगाव व पंचक्रोशीतील शिवप्रेमींनी मुख्यत: ठोंबरे, केदारे भाऊबंद, सुदामदादा, शंकर जाधव यांनी कठोर मेहनत घेतली. गौरी देशमुख हिच्या गायनाद्वारे निश्चयाचा महामेरू व ‘आनंदवनभुवनी’ हे समर्थ रचित पत्र व स्फुट काव्या सादर केले व जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला. मराठवाड्यात भव्य व्यासपीठावर ही सेवा मुकुंद गोलटगावकर यांनी दिली. सलग पाच दिवस शिवचरित्र सादर होण्याची दुसरीच वेळ. याआधी एप्रिलमध्ये छत्रपती संभाजी विद्यालयात असे शिवचरित्र आयोजित करण्यात आले होते.