टी-ट्वेण्टी मॅचच्यावेळी दुर्घटना; गावसकर, मांजरेकर थोडक्यात बचावले

1

सामना ऑनलाईन । लखनौ

मंगळवारी हिंदुस्थान वेस्ट इंडीजमध्ये दुसरा टी-ट्वेण्टी सामना लखनौ येथे नवीनच बांधण्यात आलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर खेळवण्यात आला. या मैदानावर हा पहिलाच सामना होता. मात्र सामना सुरू असतानाच कॉमेंट्री बॉक्समध्ये एक दुर्घटना झाली यावेळी प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर व संजय मांजरेकर थोडक्यात बचावले आहेत.

सामना सुरू असताना गावसकर व मांजरेकर कॉमेंट्री करत होते. त्याचवेळी अचानक कॉमेंट्री बॉक्सचा काचेचा दरवाजा धाडकन कोसळला व त्याच्या काचा सगळीकडे विखुरल्या गेल्या. त्या दरवाज्यापासून काही अंतरावरच हे दिग्गज खेळाडू बसलेले होते. सुदैवाने या दुर्घटनेत त्या दोघांनाही इजा झालेली नाही. ”आम्ही कॉमेंट्री करत असताना काचेचा दरवाजा अक्षरश: पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली, सुदैवाने आम्हाला इजा झाली नाही”, असे मांजरेकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.