… तर क्रिकेटमधील मजाच निघून जाईल,सुनील गावसकरांची MCC वर टीका

सामना ऑनलाईन, मुंबई

हिंदुस्थानचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) प्रस्तावावर कडाडून टीका केली आहे. कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी मिळावी यासाठी एमसीसीकडून नवीन प्रस्ताव ठेवण्यात आले, मात्र एक प्रकारच्या चेंडू वापराच्या प्रस्तावावर सुनील गावसकरांनी विरोध केला असून यामुळे क्रिकेटमधील मजाच निघून जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केलीय. तसेच एक प्रकारचा चेंडू वापरण्यात आल्यास परदेशात खेळण्यातील चुरस कमी होईल असेही त्यांनी म्हटले आहे.

एमसीसीकडून प्रमाणित चेंडूच्या वापराबाबत सांगण्यात आले आहे. हळू, हळू खेळपट्टी, बॅट आणि सर्व काही प्रमाणित होताना दिसेल. पण या सर्व बदलांमुळे क्रिकेटचे नुकसान होणार आहे, असे गावसकर म्हणाले.