सुनील शेट्टीने केला मराठी चित्रपटाचा शुभारंभ

134

सामना ऑनलाईन । मुंबई

ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट व गोल्डन ग्लोब प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित ‘अ ब क’ या मराठी चित्रपटाचा शुभारंभ प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. या प्रसंगी ‘लायन’ फेम सनी पवार याचे आजोबा भीमराव पवार, चित्रपटाचे दिग्दर्शक रामकुमार शेडगे, लेखक आबा गायकवाड, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपटाचे निर्माते मिहीर सुधीर कुलकर्णी आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

सध्या मराठी चित्रपट उत्तुंग यश संपादित करत आहे. या चित्रपटात मीसुद्धा काम करतोय. मला मराठी चित्रपट खूप आवडतात. मी उत्तम मराठी बोलतो. ‘अ ब क’ हाही चित्रपट खूप यश संपादन करेल याची मला खात्री आहे, अशी भावना अभिनेते सुनील शेट्टी यांनी व्यक्त केली. ‘अ ब क’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रामकुमार शेडगे करणार असून चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद आबा गायकवाड यांचे आहेत. या चित्रपटाला राहुल रानडे यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटात सनी पवार सह नवाजुद्दीन सिद्दकी, तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी, तन्वी सिन्हा आदी दिग्ग्ज कलावंत काम करणार आहेत.

विशेष म्हणजे हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, इंग्रजी, तामीळ, तेलुगू अशा पाच भाषांमध्ये निर्माण होणार आहे. या चित्रपटासाठी अमृता फडणवीस पार्श्वगायन करणार असून चित्रपटाचे चित्रीकरण १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या