सनी देओल आणि डिंपलचं या वयात हे चाललंय तरी काय?

सामना ऑनलाईन, लंडन

सनी देओल आणि डिंपल कपाडीया यांच्यातील प्रेमसंबंध जगजाहीर आहेत. विवाहीत असतानाही हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले मात्र सनी देओलचे वडील धर्मेंद्र यांनी या प्रेमप्रकरणाला विरोध केल्याने दोघांना एकमेकांपासून दूर व्हावं लागलं होतं. असं असताना लंडनमधला या दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय.

९ ऑगस्टचा हा व्हिडिओ असून हा व्हिडिओ युट्यूबवर जवळपास १ लाख ४६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे. या व्हिडिओमध्ये दोघे एकमेकांच्या हातात हात घालून एका बस स्टॉपवर बसलेले बघायला मिळतायत. या व्हिडिओमुळे या दोघांमधले प्रेमसंबंध अजून कायम असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये सुरु झाली आहे.