सनी बाहुबलीच्या प्रेमात!

1

सामना ऑनलाईन । मुंबई

देशभर सध्या एका सिनेमाची सातत्यानं चर्चा होत आहे आणि तो सिनेमा म्हणजे बाहुबली.. सिनेमाच्या दुसरा भाग म्हणजे बाहुबली-२ची येत्या २८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत असून प्रेक्षक आतुरतेनं सिनेमाची वाट पाहत आहेत. बाहुबली-१ सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. सिनेमाची भव्यता, ग्राफिक्स, सेट या सगळ्यांच्या प्रेमात प्रेक्षक पडले. मात्र एका प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना हवंय ते म्हणजे ‘कट्प्पाने बाहुबलीला का मारलं.’ सगळ्यांप्रमाणेच सनी लिओनीलाही या प्रश्नाच्या उत्तराची उत्सुकता आहे.

सनीने ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितले की, ‘मी देखील बाहुबली-२ सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहे. बाहुबलीचा पहिला भाग खूप छान आहे, मी तो पाहिला आहे. मला आता बाहुबलीचा दुसरा भाग पाहायचा आहे आणि कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं हे जाणून घ्यायचं आहे.’ त्यामुळे बॉलिवूड कलाकारांनादेखील कट्टप्पाने बाहुबलीला का मारले या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायची उत्सुकता आहे असे दिसते आहे.