सनी लिओनी कॅनडात गेली, पण कुणासाठी?

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लिओनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून अनेकांना तिच्या अदांनी घायाळ केलं आहे. बॉलिवूडसोबतच अभिनेत्री सनी लिओनीचे तिच्या कुटुंबावरही खूप प्रेम आहे. म्हणूनच सनी आपल्या कामात व्यस्त असतानाही कुटुंबासाठी वेळ काढत कॅनडात पोहोचली आहे.

सनीच्या चुलत बहिणीचं कॅनडात लग्न आहे आणि यासाठीच सनी तिथं पोहोचली आहे. चुलत बहिण्याच्या लग्नात तिनं मनमुराद आनंद लुटला. लग्नातील अनेक सोनेरी क्षण सनीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अर्चना कोचरने डिझाईन केलेला स्पेशल ड्रेस तिने स्वागत समारंभावेळी परिधान केला होता आणि यामध्ये ती फारच सुंदर दिसत होती.

सनीच्या चुलत बहिणीचे नाव ‘दीपा नामा’ असं आहे. दीपा ही कॅनडाच्या ब्रॅम्पटन सिटीत राहते. या लग्नाबद्दल सनी खूपच उत्सुक होती. मी लहानपणापासून काका आणि माझी चुलत बहिण दीपा यांच्या खूप जवळ होती. आम्ही खूप चांगला वेळ एकत्र घालवला आहे. तिच्या लग्नात सहभागी होण्याची संधी मी मिस करू इच्छित नाही. हे तिच्यासाठी एक सरप्राईज आहे आणि या सरप्राईजनंतरचा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी मी कमालीची उत्सुक असल्याचं सनीनं आधीच म्हटलं होतं.

दरम्यान, तिचा आगामी सिनेमा ‘तेरा इंतजार’ची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. या सिनेमात ती अरबाज खानसोबत झळकणार आहे.

Baby girl @deepanama getting married!!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on