सनी लिओनी करणार ‘या’ सुप्रसिद्ध शोचं सूत्रसंचालन

सामना ऑनलाईन । मुंबई

एमटीव्हीचा लोकप्रिय कार्यक्रम स्प्लिट्सविलाचं सूत्रसंचालन केल्यानंतर आता सनी लिओनी एका लोकप्रिय कार्यक्रमातून पुन्हा दिसणार आहे. डिस्कव्हरी वाहिनीच्या मॅन व्हर्सेस वाइल्ड या गाजलेल्या कार्यक्रमाच्या हिंदुस्थानी व्हर्जनमध्ये सनी लिओनीची वर्णी लागली आहे.

मॅन व्हर्सेस वाइल्ड हा कार्यक्रम जंगलसफारी आणि त्यातल्या धाडसी जीवनशैलीला समर्पित आहे. या मूळ कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बेअर ग्रिल्स स्वतः हे कारनामे करून दाखवतो. त्यामुळे या शोला सर्व जगभरात तुफान लोकप्रियता लाभली आहे. त्याचं हिंदी व्हर्जन मॅन व्हर्सेस वाइल्ड विथ सनी लिओनी असं असणार आहे. सनीने आपल्या या नव्या कार्यक्रमाबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. ती म्हणाली की, ‘मी या कार्यक्रमाचा भाग होणं हे माझं भाग्य समजते. ही मी माझ्यातलं साहस दाखवण्याची संधी समजते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षक माझी न पाहिलेली बाजू पाहू शकतील.’

या शोचा प्रीमिअर २०१८ मध्ये दाखवला जाणार आहे. या कार्यक्रमात अनेक कठीण स्टंट्स केले जाणार आहेत. अर्थात बेअर ग्रिल्ससारखे खतरनाक स्टंट्स करणं सनीला शक्य होणार की नाही ते कार्यक्रम सुरू झाल्यावरच समजेल.