सनरायझर्स हैदराबादची विजयी सलामी

सामना ऑनलाईन, हैदराबाद

दहाव्या आयपीएल हंगामातील शुभारंभी लढत ३५ धावांनी जिंकून गतविजेत्या यजमान सनरायझर्स हैदराबाद संघाने आज विजयी सलामी दिली. युवराज सिंग (२७ चेंडूंत ६२ धावा), मोझेस हेन्रिक (३७ चेंडूंत ५२), शिखर धवन (३१ चेंडूंत ४०) यांच्या तुफानी फटकेबाजीमुळे हैदराबाद संघाला २० षटकांत ४ बाद २०७ असा धावांचा डोंगर उभारता आला. विजयासाठी २०८ धावांचे आव्हान स्वीकारणाऱया रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजयासाठी कडवा संघर्ष केला, पण त्यांचा डाव १९.४ षटकांत १७२ धावांवरच आटोपला आणि यजमान संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.