चारठाणा येथे उष्माघाताने घेतला एकाचा बळी

182

सामना प्रतिनिधी । चारठाणा

जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे उष्माघाताने बळी गेल्याची घटना घडली आहे. येथील नाभिक समाजातील कुंडलिक भिवाजी खाडे (60) हे आपले दैनंदिन नेहमीच्या प्रमाणे हेअर कटिंग सलूनचे काम करीत होते. अचानक आज दुपारच्या दरम्यान त्यांना उष्माघाताचा त्रास झाला. याच्यावर काही प्रथोमपचार होईपर्यंत या उष्माघाताच्या त्रासामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे चारठाणा येथील खुप हळहळ व्यक्त केली जात. याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या