आलिया-रणवीरचा सुपर डान्स

4

सामना ऑनलाईन, मुंबई

आवडत्या हीरोसोबत डान्स करायची संधी कुणी सोडणार नाही. त्यातच तो रणवीर सिंह असेल तर विचारूच नका. रणवीरच्या चाहत्यांनी डान्ससाठी त्याच्याजवळ असाच हट्ट धरला आणि त्याने तो पूर्ण केलाही. रणवीर आणि आलियाला चाहत्यांसोबत थिरकताना सुपर डान्सर सत्र 3 मध्ये बघायला मिळेल.

‘सुपर डान्सर सत्र 3’ चा स्पर्धक तेजस वर्मा याच्या शेजाऱ्यांनी सेटवर येऊन त्याला सरप्राईज दिले. ते आपल्या आवडत्या कलाकारांना पाहून भारावून गेले. त्यातच रणवीरचा एक खूप मोठा फॅन होता. त्याने रणवीरसोबत नृत्य करण्याची इच्छा क्यक्त केली. प्रॉडक्शन टीमला वेळेचे बंधन असल्याने त्यांनी अशी विनंती मान्य करता येणार नसल्याचे सांगितले. पण त्या चाहत्यासाठी रणवीर आलियासह पुन्हा स्टेजवर गेला आणि त्याने तेजसच्या शेजाऱ्यासोबत डान्स केला. रणवीरने चाहत्यांचे मन राखून त्यांना आनंदित केले. रणवीर- आलियाला बघा सुपर डान्सर सत्र 3 मध्ये या रविवारी रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!