बाहुबली-२ मधील सुपरहिट दृश्य

2

सामना ऑनलाईन, मुंबई

बाहुबलीचा दुसरा भाग २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता लोकांमध्ये आहे. या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट दृश्य हे चित्रपटाचा पहिल्या व्हिडिओ गाण्यातून उघड झालं आहे. पहिल्या भागामध्ये कटप्पा शिवाला ओळखतो आणि बाहुबली म्हणत त्याचा पाय डोक्यावर ठेवतो हे दृश्य लोकांना सर्वाधिक भावलेलं दृश्य ठरलं होतं.

‘जिओ रे बाहुबली’ या गाण्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एका हत्तीने त्याच्या सोंडेमध्ये अजस्त्र धनुष्य धरलेलं आहे, आणि या धनुष्यासाठीचा लांबलचक जळता बाण बाहुबली हाताने ओढतो आणि सोडण्याच्या तयारीत असतो असं दाखवण्यात आलं आहे. हे दृश्य चित्रपटातील सर्वोत्कृष्ट दृश्यांपैकी एक असल्याचं सांगण्यात आलं आहे.