‘म्हाळसा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात

2

सामना ऑनलाईन । मुंबई

‘जय मल्हार’ या लोकप्रिय मालिकेत म्हाळसा देवीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री सुरभी हांडे ही नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे.सुरभीचा गेल्या वर्षी तिचा बालपणीचा मित्र दुर्गेश कुलकर्णीसोबत साखरपुडा झाला होता. या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील सुरभीचे मित्र मंडळी हजर होते.

जय मल्हार मालिकेतील सुरभीने साकारलेली म्हाळसा देवीची भूमिका खूप गाजली होती. म्हाळसा देवीची साडीची स्टाईल, केशभूषा तरुणींमध्ये प्रसिद्ध झाली होती. सध्या सुरभी ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या मालिकेतील सर्व कलाकारांनी सुरभीच्या लग्नाला हजेरी लावली होती.