‘ही’ हॉट अभिनेत्री झाली आई, वाचा काय ठेवले मुलीचे नाव

12

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री सुरवीन चावला हिने नुकताच गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सुरवीन व तिचा पती अक्षय ठक्कर यांना 15 एप्रिलला कन्यारत्न प्राप्त झाले. सुरवीनने तिच्या मुलीचे नाव इवा ठेवले आहे.

‘आई होणं ही फारंच सुंदर भावना आहे. मी आणि अक्षय खूपच खूश आहोत. अचानक आयुष्य फार सुंदर झालंय. हा एकच आनंद असा आहे जो आयुष्यभर टिकण्याची गॅरंटी घेऊन येतो’, असे सुरवीनने एका वृत्तपत्राला सांगितले.

सॅक्रेड गेम्स या प्रसिद्ध वेबसिरीजमध्ये तसेच पार्च्ड, क्रिएचर, हेट स्टोरी अशा चित्रपटांमध्ये काम केलेल्या सुरवीनने तिचा बॉयफ्रेंड अक्षय ठक्करसोबत 2015 विवाह केला होता. सुरवीनने तिच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती.