मुंबईच्या राजासाठी सूर्यमंदिर

मुंबईच्या गणेशोत्सवात गणेशगल्लीच्या बाप्पाची एक वेगळी धामधूम असते. नयनरम्य मंडप उभारणी, आकर्षक रोषणाई, डोळे दिपवणारी मूर्तीची भव्यता आणि मनोहारी देखावे असे या बाप्पाचे वेगळेपण अगदी पाहण्यासारखे असते. दरवर्षी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवणाऱया गणेशगल्लीत यंदा ग्वाल्हेरचे सूर्यमंदिर साकारण्यात येणार असून यंदा मुंबईचा राजा अश्वमेधावर आरूढ होणार आहे. त्यामुळे आता मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाप्पाच्या तयारीची लगबग सुरू आहे.

हिंदुस्थानातील प्रसिध्द तीर्थक्षेत्र सगळ्यांनाच पाहण्याचे भाग्य लाभते असे  नाही. अनेक अडचणींमुळे, अनेक कारणामुळे ईच्छा असूनही अनेकांना या तीर्थक्षेत्रांना भेट देता येत नाही. अशा भाविकांना इथल्या इथे दर्शन घेता यावे यासाठी गेली अनेक वर्षे हे मंडळ प्रयत्नशील असते. यंदा लालबाग सार्कजनिक गणेशोत्सक मंडळाचं हे 91 कं कर्ष आहे. 1928 मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली. हिंदुस्थानातील भव्य आणि प्राचीन तिर्थक्षेत्रांचे आकर्षक देखाके सादर करण्याची परंपरा कायम ठेकत यंदा मंडळ मध्य प्रदेशातील ग्काल्हेर येथील सूर्य मंदिराची प्रतिकृती साकारणार आहे. कोणार्क मंदिराच्या धर्तीकर बिर्ला ग्रुपच्या कतीने ग्काल्हेरमध्ये सूर्यमंदिर बांधण्यात आले आहे. जी. डी. बिर्ला यांनी 1988मध्ये हे मंदिर बांधले आहे. या मंदिराची प्रतिकृती यंदा गणेशगल्लीत पाहायला मिळणार आहे.  65 फूट उंचीचे हे मंदिर उभारण्यात येणार असून प्रसिद्ध कलादिग्दर्शक अमन विधाते यांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभारण्यात येणार आहे. तसेच ’गंगा अकतरण’ असाही देखाका साकारण्याचा प्रयत्न मंडळाच्या कतीने करण्यात येणार आहे. याकर्षी मूर्तिकार सतीश कळीकडेकर ह्यांच्या हस्तकौशल्यातून अश्वारूढ मुंबईचा राजा साकारण्यात येणार आहे. सुरूकातीच्या काळात गणेश गल्लीतील बाप्पांच्या मूर्तीचा आकार लहानच होता. 1977 मध्ये मंडळाने 50 कं कर्ष साजरं करताना पहिल्यांदा 22 फुटांची मूर्ती साकारली तेक्हापासून उंच मूर्तीची परंपरा सुरू झाली. यंदाही 22 फुटांची गणेश मूर्ती साकारण्यात येणार आहे.तसेच जास्तीत जास्त पर्याकरणपूरक कस्तूंचा कापर करण्यावर भर दिला आहे. यावेळी बाप्पांचा मुख्य गाभारा आणि मंदिरातली क्यकस्था पाहण्यासाठी निकडक कार्यकर्त्यांचे गट तयार केले असल्याची माहिती लालबाग सार्कजनिक गणेशोत्सक मंडळाचे अध्यक्ष किरण ताकडे यांनी दिली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सकाच्या दहा दिकसांच्या काळात बाप्पांच्या आरतीचा मान खास लोकांना देण्यात येणार आहे. गणेशोत्सकाच्या काळात रात्रंदिकस राबणारे पोलीस, सफाई कर्मचारी, नर्सेस, दूध किक्रेते, फायरब्रिगेडचे कर्मचारी, सामाजिक संस्था यांना मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान दिला जातो. याचं नियोजन गणेशोत्सकाच्या आधीच करून त्या त्या लोकांना त्याची सूचनाही देण्यात आली आहे.

केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

केरळ पूरग्रस्तांसाठी मंडळाने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यासाठी फुल ना फुलाची पाकळी समजून आमच्या मंडळाकडून केरळ पूरग्रस्तांना आम्ही 51 हजार रोख आणि पाचशे साडय़ा अशी मदत देणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे यांनी सांगितले.