पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण, सुषमा स्वराज यांनी मागितली माहिती

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानच्या सिंध भागात होळीच्या दिवशी दोन तरुण मुलींचे अपहरण करण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने इस्लाम स्विकाराण्यास भाग पाडले. यासंदर्भात हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानमधील हिंदुस्थानी राजदुतांकडे माहिती मागितली आहे. स्वराज यांनी ही बातमी ट्विट करून पाकिस्ताच्यामधील हिंदुस्थानच्या उच्चायुक्तांकडे अहवाल पाठवण्यास सांगितले आहे.

प्राथमिक माहितीनुसार होळीच्या दिवशी 13 वर्षीय रवीना आणि 15 वर्षीय रीना या दोन अल्पवयीन मुलींचे काही बहुसंख्यांक समाजातील लोकांनी त्यांच्या राहत्या घरातून अपहरण केले. त्यानंतर दोघींना जबरदस्तीने मुस्लीम धर्म स्विकारायला लावला आणि जबरदस्तीने लग्न लावून दिले. सिंध प्रांतातील हिंदु समुदायाने या घटनेचा निषेध केला आहे. तसेच गुन्हेगारांविरोधात कारवाई केली जावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.