Video: जम्मू कश्मीरमध्ये घातपाताचा कट उधळला, रस्त्यालगत ठेवलेली स्फोटके

10

सामना ऑनलाईन । जम्मू

जम्मू कश्मीरमधील जम्मू-पूँछ महामार्गावरील कल्लर भागात रस्त्यालगत स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर तत्काळ घटनास्थळी पोहोचलेल्या बॉम्ब शोधक पथकाने त्या स्फोटकांचा स्फोट घडवत ती नष्ट केली आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात हाय अलर्ट घोषीत करण्यात आला आहे.

जम्मू-पूँछ महामार्गावरील कल्लर भागात रस्त्यालगत स्फोटकांचा साठा सापडल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. तब्बल तीन तास या मार्गावरील वाहतूक बंद होती.

… सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

आपली प्रतिक्रिया द्या